औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यावर आज गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास भाजप प्रदेश माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी जोरदार पलटवार करताना राऊतांना आरशात बघण्याचा सल्ला दिला.नवनाथ बन म्हणाले की पंतप्रधान ओबीसी आहेत. आमचा डीएनए ओबीसी आहे. पण राऊतांचा डीएनए अब्दाली आणि औरंगजेबाचा आहे का? तुम्ही ओबीसींचा अपमान करत आहात. ओबीसींचा प्रश्न कुणी सोडवत असेल तर तुम्ही टीका करता. हे संजय राऊतांना शोभत नाही.