सातारा जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी दुपारी ४ वाजता रिपाई एच्यावतीने निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा शहरात सदरबाजार आकाशवाणी झोपडपट्टी, बुधवार पेठ लकडी पुलाशेजारी बेकायदेशीरपणे वैद्यकीय परवानगी न घेता जनावरांची कत्तल केली जात आहे. त्याची मांस विक्री केली जाते. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची भिती असून याची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी रिपाइं एच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.