आज शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या जनतेप्रती असणारी समर्पण भावना आणि कर्तव्यनिष्ठ कार्यतत्परतेवर सर्वांचा विश्वास आहे. अजित पवारांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या योजनांनी महिला, युवक, शेतकरी आणि दुर्बल घटकांशी एक विश्वासाचं नातं निर्माण केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समर्पण हे केवळ जनतेच्या सर्वांगीण विकासप्रती असून, आमचे राजकारण निवडणुका जिंकण्यापुरते मर्यादित नाही.