थेट लघुदाब वीज वाहिनीवर अवैधपणे आकडा टाकून एकाने २५ हजार ४७७ रुपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.तेजलाल बालचंद खैरवार (४१, रा. पुजारीटोला-कासा) याच्या घराची महावितरणच्या फिरत्या पथकाने तपासणी केली असता, त्यात त्याने वीज वाहिनीवर अवैधपणे आकडा टाकून २५ हजार ४७७ रुपयांची वीज चोरी केल्याचे उघडकीस आले. कार्यकारी अभियंता शेखर बिंदाबन दास (३८) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भारतीय विद्युत कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आह