भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील शाळेच्या रस्त्यावर असलेल्या रोहित्राच्या खांबात विजप्रवाह उतरल्याने शॉक लागून एक म्हैस जागीच ठार झाली. या प्रकरणी अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती, दि. २५ रोजी तालुका पोलिस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे. संजय मुरलीधर बोदडे यांच्या मालकीची ही म्हैस जाफरी जातीची होती. या अपघातामुळे संजय बोदडे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.