सावंतवाडी शहरात पोलिसांनी ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या मटका जुगारावर शनिवारी मोठी कारवाई केली आहे. एका हॉटस्पॉट नंबरवर 'कल्याण मटका'चे आकडे स्वीकारताना दोन जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतवाडीत ऑनलाईन मटका जुगाराचे रॅकेट उघड झाले आहे. रात्री ८ च्या सुमारास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सालईवाडा परिसरात एका व्यक्तीला मोबाईल हॉटस्पॉटचा वापर करून कल्याण मटका जुगाराचे आकडे घेताना पकडण्यात आले.