चिपळूण शहरातील कळंबस्ते येथील ज्ञानेश्वरी अपार्टमेंटमध्ये घरफोडीची गंभीर घटना उघडकीस आली आहे. दोन सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजेपासून ते तीन सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजेदरम्यान अज्ञात इसमाने अमर लक्ष्मण टोमके (वय ४२) यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून सुमारे दोन लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी घरातून मंगळसूत्र, नेकलेस, कानातले, चैन अशा मौल्यवान दागिन्यांवर हात साफ केला आहे. या प्रकरणी टोमके यांनी चिपळूण पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे