ऐन पावसाळ्याच्या दिवसात राहते घर कोसळल्याने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे सदरची घटना दि.11 सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजे दरम्यान देवरी तालुक्यातील ग्राम डवकी येथील असून देवराज बाबुराव राऊत वय 42 वर्ष असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे शासनाला तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे सविस्तर असे की देवरी तालुक्यातील ग्राम डवकी येथील रहिवासी शेतकरी देवराज बापूराव राऊत यांच्या शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा आहे यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो