पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील खारघर प्रभागातील सेक्टर 35, तळोजा गाव ,कोयनावळे येथील रस्ते दुरूस्तीची आज गुरुवार दिनांक ११ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांनी प्रत्यक्ष पहाणी केली. रस्ते दुरूस्तीची कामे तातडीने करण्याबाबत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती लवकरात लवकर करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.