मुख्यमंत्री ग्राम सड़क योजने अंतर्गत लोणार तालुक्यातील वेणी, गुंधा, जाफ्राबाद, दाभा,मार्गे वाशीम जिल्हा रोडच्या हद्दी पर्यंत माती मिश्रीत मुरमाचा सर्रास वापर करून रोडचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे सुरू आहे.सदरील काम करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा लोणार तालुका अध्यक्ष शेख जावेद यांनी केली आहे.