धुळे जिल्हा परिषदेत आज वादंग उसळला. रिपब्लिकन मराठा आघाडीचे डॉ. पंकज साळुंखे यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण कुवर यांच्यावर कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचे आरोप केले. पदोन्नती बनावट असल्याचा आणि बदल्या-मान्यता प्रक्रियेत आर्थिक गैरप्रकार झाल्याचा दावा करत त्यांनी सीईओ अजीज शेख यांना निवेदन दिलं. कुवर यांना दोन दिवसांत सक्तीच्या रजेवर पाठवून SIT चौकशी करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा साळुंखे यांनी दिला आहे.