मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्न संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या समावेत बसलेल्या आंदोलनकर्त्या मराठा समाज बांधवांची जेवनाची गैरसोय होऊ नये म्हणून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वतीने दोन खाद्यपदार्थांच्या गाड्या पाठवण्यात आल्या आहेत. आज मंगळवारी दुपारी राहुरी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात येथून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या,फरसाण तसेच खाद्यपदार्थांच्या या गाड्या मुंबईला रवाना करण्यात आल्या आहेत.