आज दुपारी तीन ते साडेतीन च्या दरम्यान बेलोरा येथून मोर्शीकडे जाण्यासाठी निघालेल्या दुचाकीला समोरून येणारे दुचाकी ने जबरदस्त धडक दिली यात एक दुचाकी स्वार ठार झाला तर एक किरकोळ जखमी झाला.. महेश चरपे वय पंचवीस वर्षे राहणार वंडली तालुका वरुड जिल्हा अमरावती असे मृतकाचे नाव आहे तर किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीचे अधिकृत नाव कळू शकले नसल्याची माहिती सायंकाळी पावणे सहा वाजता पोलिसांनी दिली