भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन परप्रांतीय ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास महूद-दिघंची रोडवर चिकमहूद येथील निरा उजवा कालवा वळणावर घडला. अपघातानंतर चालकाने टेम्पोसह घटनास्थळावरून धूम ठोकली. या अपघातात चुलबुल अन्नू मुसाहिर (वय २४) आणि सुभाष फुलचंद मुसाहिर वय २५, रा. सध्या दोघेही रा. दिघंची, ता. आटपाडी, मूळ रा. उत्तर प्रदेश अशी मृत परप्रांतीय ऊसतोड कामगारांची नावे आहे