शिवसेना उबाठा गटाचे उपनेते शरद कोळी यांनी रविवारी दुपारी 3 वाजता पत्रकारांशी बोलताना गंभीर आरोप करत म्हटले की, मंत्री नितेश राणेंना वाढीव हफ्ता न दिल्यामुळे त्यांनी मटका बुकीवर धाड घातली. या कारवाईमागे कायद्याची अंमलबजावणी नसून, वैयक्तिक फायद्यासाठी दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचा कोळी यांचा दावा आहे. याबाबत पुढील चौकशी व्हावी, तसेच मंत्र्यांनी या आरोपांना उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.