चार हुतात्मा चौक येथे सोमवारी दुपारी 1 वाजता उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या वराह जयंती साजरा करण्याच्या आवाहनामुळे त्याचा निषेध म्हणून शिवसैनिकानी तीव्र शब्दांत निषेध केला. यावेळी कार्यकर्त्यांनी राणे यांच्या फोटोंवर वराहाचे चित्र चिटकवून निषेधाचे प्रतीकात्मक प्रदर्शन केले. या आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राणे यांच्यावर टीका केली. "नितेश राणे माफी मागा", "शिवसेना झिंदाबाद" अशा घोषणा देण्यात आल्या.