आमगाव नगरपरिषद क्षेत्रातील रिसामा भागातील रस्ते व नाल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या वतीने आज नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, रिसामा परिसरातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात व रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत