गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत उद्धट वागणुक देवून धार्मिक भावना दुखावल्यामुळे जबाबदार असलेल्या ठाणेदारासह अन्य अधिकार्यांवर कारवाई करुन अनसिंग शहरातील अवैध धंद्यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र तपास समिती नेमावी आणि भविष्यात धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भावनांचा आदर राखत योग्य बंदोबस्ताची हमी देण्याची मागणी अनसिंग येथील नागरिकांनी दि. 11 सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.