पाच दिवसांपासून सुरू असलेले मनोज पाटील जरांगे यांचे उपोषण अखेर मंगळवार तारीख 2 सप्टेंबर रोजी सुटले मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी आधी मसुदा दिला व त्यानंतर एक तासात जीआर देखील आणला जरांगे पाटलांनी व्यवस्थित जीआर पडताळून वाचला तसेच वकिलांच्या मार्फत सुद्धा सगळे जीआर व्यवस्थित तपासून घेतले तसेच मागच्या 75 वर्षात विजय झाला नसेल असा विजय मराठ्यांचा झाला आहे असे विधान प्रसंगी मनोज पाटील जरांगे यांनी केले.