शनिवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास साकीनाका परिसरातील खैरनी रोडवरील एस जे स्टुडिओ समोर एका हाय टेन्शन वायरला विसर्जन मिरवणुक ट्रॉलीचा संपर्क झाल्यामुळे वीज प्रवाह ट्रॉलीमध्ये उतरून पाच जण गंभीर जखमी झाले होते यात दुर्दैव एकाचा मृत्यू झाला असून अन्य चार जणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत व्यक्तीमध्ये बिनू शिवकुमार यांचा समावेश असून अन्य चार जण जखमी आहेत