जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कंजरवाडा येथे एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एका मोठ्या कारवाईत गावठी हातभट्टी दारूचे सुमारे ३ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले. पोलीस अधीक्षक गणेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून, काही आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.