मंत्री केवळ फोटोसेशन करतात – माजी महसूलमंत्री थोरात यांचा आरोप अहिल्यानगर : तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राज्यातील मंत्र्यांवर सडकून टीका केली. पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्याऐवजी मंत्री केवळ फोटोसेशन आणि पर्यटन करण्यात व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला.