दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रघु बाबू यांनी आज बुधवार ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कुटुंबासह श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.या वेळी त्यांनी समाधीसमोर सायीस आरती व पूजा अर्चना करून आशीर्वाद घेतला. साईबाबांच्या दर्शनानंतर रघु बाबूंनी मंदिर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या भेटीने शिर्डीत उपस्थित भाविकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली होती.रघु बाबू हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील विनोदी व वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत.