आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 वार सोमवार रोजी दुपारी 2 वाजता बदनापूर शहरातील पोलीस ठाणे येथे येणाऱ्या सण उत्सव म्हणजे गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थिती लावली व योग्य ते मार्गदर्शन केले तसेच सर्व सण उत्सव शांततेत व कायद्यात राहून पार पाडावे असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी केले.