शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाकडून जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ऍड. चारुशीला टोकस, डॉ. अभ्युदय, मनोज चांदेकर, सुधीर पांगुळ, सुरेश ठाकरे, बाळा माऊस्कर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे आज तीन ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे