गोटूल समितीची वार्षिक सभा ७ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा जंगल कामगार सोसायटी येथे यशस्वीरीत्या पार पडली. या सभेत आगामी २ ऑक्टोबर २०२५ रोजी होणाऱ्या आदिवासी देवी-देवतांच्या महापूजा व भव्य मेळाव्याच्या आयोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.सभेला अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात माजी आमदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी आणि गोटूल समितीचे अध्यक्ष श्री. नंदूभाऊ नरोटे यांचा समावेश होता.