परंडा तालुक्यातील माळी गल्ली येथे ७ सप्टेंबर रोजी रात्री तरुणावर तलवारी व लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. उत्तम पोपट गोरे (२४) यांच्यावर बाबा विष्णु गोरे, संतोष गोरे व कृष्णा उर्फ लक्ष्मण गोरे यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी ९ सप्टेंबर रोजी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून आरोपींवर भा.दं.वि. व हत्यार कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.