निमगाव भोगी (ता. शिरूर) येथे कौटुंबिक वादातून झालेल्या घटनेत मुलाने वडिलांवरच चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार दि.२२ ऑगस्ट रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली असून आरोपीस रांजणगाव पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.