आज शनिवार दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर बाबत संशय व्यक्त करणाऱ्या, देशाच्या जवानांनी गाजवलेल्या शौर्यावर शंका व्यक्त करणाऱ्या लोकांना सिंदूरबाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच नाही. २०१९ ला "एकाशी लग्न, दुसऱ्याशी संसार" हे अभियान राबवले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांच्या कुवतीच्या पलीकडचा विषय आहे. ते केवळ काँग्रेसकडून आलेला कागद वाचून दाखवतात.