बुलढाणा शहरातील विश्वास नगर येथील २५ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान घडली आहे. मृतक युवकाचे नाव राहुल दिलीप गवई असे आहे.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.