विसलोन ग्रामपंचायत हद्दीत झालेले काँक्रिट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून, अवघ्या सहा महिन्यांतच रस्ता तुटू लागला आहे. गिट्टी, सिमेंट उखडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे, तसेच अंदाजपत्रकात नमूद असूनही नाली बांधकामाचे काम आजतागायत झालेले नाही. मात्र ठेकेदारामार्फत "काम पूर्ण झाल्याचा" फलक लावण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.