विकसित महाराष्ट्र व्हिजन २०४७ ही केवळ कागदावरची योजना नसून ती प्रत्यक्षात कार्यान्वित होऊन महाराष्ट्राचा विकासाचा वेग वाढविण्याचा निर्धार आहे. शेतकरी हा प्रमुख घटक आहे या विविध सादरीकरणातून योजनांचा कालबद्ध पद्धतीने नियोजन करून महाराष्ट्र देशात आघाडीवर राहील आणि विकसित भारतात महाराष्ट्राचे योगदान मोठे राहील असे मत आज सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथिगृहात आयोजित ‘विकसित महाराष्ट्र व्हिजन डॉक्युमेंट २०४७ च्या संदर्भातील आढावा बैठकीत बोलत होते