विनोद काटोरे हे साईनाथ इलेक्ट्रिक कंपनी येथे गोडाऊन सुपरवायझर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीचे गोडाऊन खडगाव रोडवर आहे. अज्ञात आरोपीने गोडाऊन समोरील मोकळ्या जागेत ठेवलेले वेगवेगळ्या कंपनीचे वायर किंमत तीन लाख 34 हजार 708 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.