बुलढाणा तालुक्यातील बिरसिंगपूर येथे 24 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता च्या दरम्यान शिवाजी कड यांच्या 70 फूट खोल असलेल्या विहिरीमध्ये भला मोठा साप आढळून आला साप दिसतात सर्पमित्र एस.बी रसाळ यांना माहिती दिली असता सर्पमित्र एस.बी रसाळ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले शिवाजी कड यांच्या शेतातील 70 फूट खोल विहिरीतून अजगर सापाला पकडून विहिरीबाहेर काढले. विहिरीत पडलेल्या सापाला बाहेर काढून सापाबद्दलची भीती दूर केल्याबद्दल आभार व्यक्त केले.