माजलगाव येथे तहसील कार्यालयासमोर आज मंगळवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सकल ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की, ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित ठेवावे. तसेच इतर समाजांना आरक्षण देताना ओबीसींच्या हक्काला धक्का लागू नये, याची हमी शासनाने द्यावी. ओबीसी समाजाचे आरक्षण हे शिक्षण, नोकरी आणि सामाजिक प्रगतीचे प्रमुख साधन असल्याचेही यावेळी सांगण्यात