राष्ट्रीय महामार्ग क्रं. 161 वर मालेगाव तालुक्यातील मेडशी बायपास येथे झालेल्या भीषण अपघातात गजानन सिताराम अवचार वय 55 रा. लोणार यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दि. 31 ऑगस्ट रोजी दिली. एम.एच. 28 यु 4316 या क्रमांकांच्या मोटार सायकलने ते पातूरकडे जात असताना मेडशी बायपासवर सीजी 04 एचव्ही 5292 या क्रमांकाचा ट्रक चालकाने अचानक रस्त्याच्या मधोमध उभा केल्याने त्यांची दुचाकी ट्रकवर जाऊन धडकली. अपघाताची माहिती मिळताच पोउपनि राजेश येलगुलवार व इतर अधिकार्यांची घटनेचा पंचनामा केला.