ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत वाशिम शहरात दि 27 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक काढून गणपतीचे आगमन झाले.पुढील १० दिवस गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात पार पडणार असल्यामुळे सगळ्याच मोठ्या गणपती मंडळामध्ये उत्साहाच वातावरण आहे, बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते विठ्ठलवाडी परिसर तसेच पाटणी चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर तर गर्दीने फुलून गेला होता. श्रींच्या आगमन मिरवणुकीत अबालवृद्ध थिरकताना पहावयास मिळाले .