आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील व शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच तालुक्यातील सिपोरा अंभोरा ,वरुड या गावांसह परिसरातील हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी च्या उपोषण स्थळी दाखल होत त्यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले आहे.