माथेरान शहरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने रस्त्यांचे दुरुस्ती करण्यात आली होती. दस्तुरी नाक्यापासून ते लायब्ररी पर्यंत घाईघाईत पेवर ब्लॉक बसविण्यात आले होते. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसाळ्यात हे पेवर ब्लॉक खड्डेमय झाले आहे. मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. माथेरान शहरात गणेश उत्सव काळात नागरिकांना नादुरुस्त रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागणार आहे.