जायकवाडी धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या नाशिक, नगर, गंगापूर भागातून जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. गोदावरी नदीच्या पात्रात वरच्या आवकनुसार सध्या ४७हजार १६० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोदावरीत रात्री उशिरा पाणी सोडले तर पुन्हा २००६ ची पुनरावृत्ती होते की काय अशी धडकी भरली आहे.