पोळ्याच्या पार्श्वभूमीवर आर्वी पोलिसांनी वर्धा टी पॉइंट रोड येथे दिनांक 20 तारखेला साडेतीन-चार च्या दरम्यान कारवाई करून गावठी मोहा दारू आणि डीलक्स मोटरसायकल क्रमांक एम एच 34 74 असा एकूण जुमला किंमत 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला विकी विक्रम भोसले वय 19 वर्ष तसेच एका महिलेला ताब्यात घेतले ही कार्यवाही ठाणेदार सचिन डेहनकर यांच्या मार्गदर्शनात अमर हजारे अंकुश निचत अमोल गोरटे भूषण इखार सुरज रिठे आदींनी केली दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले