धाराशिव व उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे तेरणा ट्रस्टतर्फे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात तब्बल १३०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर राबवण्यात आलेल्या या अभियानांतर्गत तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, नेरुळ, नवी मुंबई यांच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले. धाराशिव शहरातील शांतिनिकेतन कॉलनी, पोलाद नगर पारधी पिढी आणि येणेगूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने