अतिवृष्टीमुळे पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश ! अहमदपूर व चाकूर तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीत व्हिडिओकॉन कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील सहभागी झाले होते मागील दोन दिवसांपासून चालू असलेल्या अतिवृष्टीमध्ये विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांच्या संपर्कात राहून विविध ठिकाणी झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करत नागरिकांना धीर दिला. याबद्दल प्रशासनाचे कौतुक करत आभार मानले