आज रविवारी दुपारी ४ च्या सुमारास मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यांच्या मागण्यांमध्ये कोणतीही कमी राहू नये, तसेच अंमलबजावणीच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच अनेक मंत्री अधिकारी उपस्थितीत होते.