कोराडी येथील सुप्रसिद्ध श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान हे दिनांक सात सप्टेंबरला चंद्रग्रहण असल्यामुळे मंदिराचे दरवाजे सात सप्टेंबर दुपारी साडेबारा वाजता पासून ते 8 सप्टेंबर सकाळी सहा वाजेपर्यंत बंद करण्यात आले आहे. या कालावधीत मंदिर परिसरात भाविकांसाठी प्रवेश बंद असणार आहे तसेच दर्शनासाठी देखील मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले आहे. दरम्यान उद्या सकाळी सहा वाजता हे दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.