मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या भव्य मोर्चात धुळे जिल्ह्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. मराठा सेवा संघाच्या बैठकीत धुळे, शिरपूर, शिंदखेडा व साक्रीतील बांधवांचा निर्धार झाला. सहभागी होणाऱ्यांनी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता धुळे रेल्वे स्टेशनवर जमावे, तसेच आवश्यक साहित्य सोबत न्यावे, असे आवाहन करण्यात आले. मोर्चा शांततेत व एकजुटीत काढण्याचे आवाहनही करण्यात आले.