नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्याबद्दल आज बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, आम्ही त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. आम्हाला आशा आहे की ते पदाची प्रतिष्ठा राखतील, संविधानानुसार देशाचे राज्य करतील आणि राज्यसभेचे कामकाज सुरळीत चालेल.