मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का. कारण मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे. ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं, तेच आज सत्तेत आहेत, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होऊनही प्रश्न का सुटत नाही. आतापर्यंत मराठ्यांना फसवण्यात आले. ही सर्व जबाबदारी सरकारची आहे.