मेळघाट परिसरातील नागापूर येथील अनुदानित आश्रमशाळेतील पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, तर तीन विद्यार्थ्यां गंभीर जखमी झाल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट चिखलदरा पोलीस ठाणे गाठत संताप व्यक्त केला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यानंतर पोलिसांनी रात्रीपासून दोघांना ताब्यात घेतल्यामुळे यशोमती ठ