पंढरपूर तालुक्यातील चळे येथे आज शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता बैलपोळा सणानिमित्त म्हशी पळवण्याचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरवर्षी बैलपोळा सणानिमित्त शेतकरी बांधव आपल्या बैलांना सजवून, पूजा करून सण साजरा करतात. यावेळी विविध गावांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळ आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. अनेक ठिकाणी बैलांच्या जोडीसह म्हशी पळवण्याचाही कार्यक्रम पारंपरिक उत्साहाने साजरा केला जातो.